मी ही आशावादीच आहे
…………..
सांप्रत ज्वलंत सत्याप्रती
डोळेझाक करने परवडण्या सारखे नाही
प्रतिक्रांतीवाद्यांचे मनसुबे
दिनोदिन बुलंद होत आहेत
सावज टप्पयात सेण्यासाठी
चहुदिशांनी हाकारासुरू आहे...
संशयाचं दाट धुकं
जाणीयपूर्वक पेरलं जात आहे
जागोजागी सापळे लावले जात आहेत
नेमकी कमजोर नस दाबली जात आहे
विकृतिंच्या पुनुरूज्जिवनाच्या अशा
संक्रमणसमयी आपल्या भात्याची ही
जरा तपासणी आवश्यक आहे
तार्किकता, वैज्ञानिक दृष्टिकोण, संविधान निष्ठा
या आयुध बळावरच
या महाविकृतींशी दोन हात करणं
सहज शक्य आहे
विवेक संपन्न योद्ध्यांची
श्रृखंला वाढली तर
कोणत्याही अन कसल्याही
अनौरस औलादींचा टिकाव लागणं
शक्य आहे ?
......
प्रा.डॉ.संजय
जाधव
No comments:
Post a Comment