Wednesday 22 August 2018


पाचव्या बौद्ध साहित्य सम्मेलनाचे नेत्रदीपक संयोजन...परभणीकरांचा उदंड प्रतिसाद. 
==================
रविवार, दि.22 जुलै 2018 सकाळी 10.30 वाजता पाचव्या बौद्ध साहित्य संमेलनाचा अनौपचारिक प्रारंभ महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाला.
त्यानंतर सुरू झाली भव्य अन आकर्षक 'सम्मेलन धम्मयात्रा' ! यामध्ये सम्राट मित्र मंडळाचा ग्रंथ देखावा, उपा.घन:श्याम साळवे सरांच्या धम्मस्कूलचे शिस्तबद्ध विद्यार्थी व चंद्रप्रकाश लाटे या माझ्या विद्यार्थ्यांने आपल्या मित्रांच्या मदतीने साकारलेला बुद्धकालीन व्यक्ति-जीवनाचा सजीव देखावा. यासजीव देखाव्यामध्ये बुद्ध वेशभूषेत असलेला *सुमेध संजय जाधव* विशेष आकर्षणाचा केंद्र होता. अनेक जनांना त्याच्या सोबत फोट काठण्याचा मोह आवरता येत नव्हता. अत्यंत धीरगंभीर मुद्रेत सुमेध ने साकारलेला बुद्ध सर्वांनाच भावला. 
सम्मेलनचे उद्घाटन मा.खा. एकनाथ गायकवाड साहेब यांच्या हस्ते झाले. सम्मेलनाध्यक्ष मा.योगीराज वाघमारे, मा.सुरेश वरपुडकर साहेब, मा.भीमराव हत्तीअंबिरे, मा.लियाकत अन्सारी, मा. शिवाजी दळणर, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांच्या उपस्थितीने उद्घटन सोहळा नेत्रदीपक ठरला. चरण जाधव यांच्या प्रेरणा गीताने आरंभिच चैतन्याच्या लाटा संपूर्ण सभागृहात पसरल्या. मी संपादित केलेली संमेलन स्मरणिका, 'बोधीप्रवाह' चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याच सोबत माझे स्वलिखित हिंदी भाषेच्या स्वभाव-वैशिष्टयांचे विवेचन करणारे ''भाषाविज्ञान-व्यतिरेकी विश्लेषण''(श्रीराम प्रकाशन, कानपुर, उत्तर प्रदेश)या संदर्भ ग्रंथाचे ही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले ही बाब माझ्यासाठी आनंददायक आहे. यानंतर या संमेलनाच्यानिमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. शासनाचा 'समाजभूषण' पुरस्काराने सन्मानित मा.भीमराव हत्तीअंबिरे यांचा मानपत्रासह सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषण सर्वांना अंतर्मुख करणारेच होते. (लवकरत या भाषणाची प्रत PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येईल)
परिवसंवादातील वक्त्यांनी "भारतीय कला, साहित्य आणि संस्कृतिवर बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव" या विषयावर आपले अभ्यासपूर्ण विवेचन केले. सन्मित्र डॉ.सुरेश शेळकेसरांनी या सत्राचे सूत्रसंचलन केले तर आभार प्रा.डॉ.कीर्तिकुमार मोरे यांनी मानले.
परिसंवादानंतर निमंत्रितांचे व स्थानीक कविंचे कवि संमेलन आयोजित करण्यात आले होते. हे कवि संमेलन जेष्ठ कवि रानबा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या कवि संमेलनात चरण जाधव, राही कदम, प्रेनामंद बनसोडे, बा.सो.कांबळे, डॉ. सलिम मोहियोद़दीन, मुक्तविहारी कुकडे, संतोष नारायणकर, सुरेश हिवाळे, प्रा. आनंद इंजेगावकर, प्रा.रामप्रसाद खंदारे, महादेव कांबळे यांनी आपल्या बहारदार व भावपूर्ण कवितांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. बा.सो.कांबळे (परळी वै) यांच्या 'गोंदण' कवितेला तर रसिक श्रोत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या कवि संमेलनाचे सूत्रसंचलन प्रा.सिद्धार्थ तायडे व प्रा.भास्कर गायकवाड यांनी केले.
कवि संमेलनानंतर संमेलनाचा समारोप कार्यक्रम झाला ज्यात प्राचार्य शिवाजी दळणर यांनी संपूर्ण दिवसभाराच्या संमेलन कार्यक्रमासंबंधी चे आपले निरीक्षण सांगत दर्जेदार कार्यक्रम घेतल्या बद्धल स्वागताध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांचे व संयोजकाची भूमिका समर्थपणे पर पाडल्या बद्धल माझे विशेष अभिनंद केले....अविस्मरणीय सोहळयासाठी उपस्थित सुज्ञजनांचे मनापासून आभार...आभार...आभार ..!!!
..........................................
प्रा.डॉ. संजय जाधव,
संयोजक, पाचवे बौद्ध साहित्य सम्मेलन, परभणी

No comments:

Post a Comment

                                               आपसी विश्वास की डोर कभी टूटने न देना                                                ...