Thursday, 23 August 2018

वामनदादांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस शब्दपुष्प सादर अर्पण
=============
आंबेडकरी विचारांचे मुक्त विद्यापीठ वामन
बेईमान आणि बेचव चळवळीचे मीठ वामन

घालून शेपटया बसले वाचाळ वीर अमाप
हिंस्त्र श्वापदांचे मोजतो दात  धीट वामन

बाजारी ढासळले नामांकित प्रतिभांचे बुरूज  
प्रज्ञासूर्याच्या स्मारकाची मजबूत वीट वामन

करती कत्तल चळवळीची स्वार्थी कलम कसाई  
उपाशी कष्टक-यांच्या स्वप्नातले पीठ वामन

तुडवी अंधारल्या वस्त्या-तांडे भूकेल्या पोटी
पाळून तो शब्द कार्य करितसे नीट वामन
..............
प्रा.डॉ.संजय जाधव

1 comment:

  1. खुप सुंदर आणि अप्रतिम कविता

    ReplyDelete

                                               आपसी विश्वास की डोर कभी टूटने न देना                                                ...